Thursday, December 30, 2010
Monday, December 27, 2010
इर्शाळगड
पावसाळ्यानंतर खरतरं बाहेर पडणे झालेच नव्हते. शेवटी एकदाचा तो मुर्हूत सापडला. कुठे जायचा हा प्रश्ण पडल्या क्षणी अनेक पर्याय समोर आले. पण सर्वानुमते इर्शाळगडाची मोहीम निच्शित झाली.
पुण्याहून ५ जणं ( चैतन्य, प्रणव, अनिरुध्द, मेधा आणि आशिष) आणि ठाण्याहून अमोघ असे ६ जणं, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरच्या चौक फाट्यावर भेटलो. चौक फाटा खोपोली पासून १० कि.मी वर आहे. चौक फाट्याच्या उजव्या हाताला ( पुण्याकडून मुंबई ला जाताना) मोरवे धरण दिसते.
मोरवे धरणाच्या भिंतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून साधारण २ कि.मी आत ठाकूरवाडी गाव आहे. ठाकूरवाडीत गाडी लावली. समोरच खोगीराच्या आकारासारख्या दिसणाऱ्या इर्शाळचे दर्शन झाले.
गावातूनचं इर्शाळवाडी कडे जाणारी मळलेली वाट पकडली. साधारण १ तासाने माचीवर असलेल्या इर्शाळवाडीत पोहोचलो. वाडीतून गडावर जायला व्यवस्थित मळलेली वाट आहे. १० मिनीटे चालल्यावर दोन वाटा फुटतात. येथे खाली जाणाऱ्या वाटेवर फूली मारलेली आहे. तीथेचं वर जाणारी एक वाट आहे. ती पकडली आणि गडावर पोहोचलो. गडाला ३ शिखरं आहेत.

त्यांना उजवीकडे ठेवून जाणारी वाट पकडली. ही वाट थेट नेढ्याकडे जाते. वर चढतानाचं एक खोदीव पाण्याचे टाकेही लागते. पाणी उत्तम आहे. याच टाक्याजवळ वर जायला एक छोटी लाकडी शिडी आहे. त्यावरून गेल्यावर एक सोपा रॉक पॅच लागतो.

तो पार केल्यावर थेट नेढ्यात पोहोचलो.
नेढ्यात पोहोचायला इर्शाळवाडीतून ४५ मिनीटे लागतात. नेढे पार करून थोडे पुढे गेल्यावर एक कातळभिंत लागते. यावर चढायला रॉक क्लायंबिंगची साधने लागतात. ती नसल्यामुळे याच कडय़ामधे असलेल्या टाक्यावर गेलो.
इर्शाळ्गडावरून चंदेरी- म्हैसमाळ, प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, माथेरान दिसतात.
पुण्याहून ५ जणं ( चैतन्य, प्रणव, अनिरुध्द, मेधा आणि आशिष) आणि ठाण्याहून अमोघ असे ६ जणं, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरच्या चौक फाट्यावर भेटलो. चौक फाटा खोपोली पासून १० कि.मी वर आहे. चौक फाट्याच्या उजव्या हाताला ( पुण्याकडून मुंबई ला जाताना) मोरवे धरण दिसते.
त्यांना उजवीकडे ठेवून जाणारी वाट पकडली. ही वाट थेट नेढ्याकडे जाते. वर चढतानाचं एक खोदीव पाण्याचे टाकेही लागते. पाणी उत्तम आहे. याच टाक्याजवळ वर जायला एक छोटी लाकडी शिडी आहे. त्यावरून गेल्यावर एक सोपा रॉक पॅच लागतो.
तो पार केल्यावर थेट नेढ्यात पोहोचलो.
नेढ्यात पोहोचायला इर्शाळवाडीतून ४५ मिनीटे लागतात. नेढे पार करून थोडे पुढे गेल्यावर एक कातळभिंत लागते. यावर चढायला रॉक क्लायंबिंगची साधने लागतात. ती नसल्यामुळे याच कडय़ामधे असलेल्या टाक्यावर गेलो.
Subscribe to:
Posts (Atom)